Ajit Pawar : अनेकदा मागितलं पण गृहमंत्री पद काय दिलंच नाही – अजित पवारांचा मोठा खुलासा

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी परिचित आहेत. कुणाचीही भीडभाड न ठेवता आपलं मत ते थेट व्यक्त करत असतात. याची परिस्थिती शुक्रवारी पुण्यात पुन्हा एकदा आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी अनेक वर्षापासून आपल्या मनात असलेली सल हसता हसता बोलून दाखवली. सरकार असताना अनेकदा मी गृहमंत्री पद मागितलं पण वरिष्ठांनी काय दिलं नाही. मला गृहमंत्री पद मिळाल्यावर हा कुणाचाच ऐकणार नाही असं त्यांना वाटत असावं असं ते म्हणाले. त्यांच्या या खुलासाने सभागृहात एकच हशा पिकला.

अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना अजित पवारांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मी जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हा तेव्हा मी वरिष्ठांकडे गृहमंत्री पद मागितलं होतं. पण मला ते दिले नाही.

यावेळी नेमकं काय झालं ते पाहूया

अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच मंचावर उपस्थित (Ajit Pawar) असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांनी दादांकडे कुठली तरी मागणी केली. त्यावर अजित पवार म्हणाले, माझ्या ओठात एक आणि पोटात एक असं कधीच नसतं. आपण सत्तेत असताना मी वरिष्ठांना गृहमंत्री पद द्या अशी मागणी केली होती. पण गृहमंत्री पद मला काही दिले नाही. अनिल देशमुख यांच्या वेळी मी गृहमंत्री पदाची मागणी केली पण त्यावेळीही मला दिलं नाही. त्यांचं गृहमंत्री पद गेल्यानंतर ही मागणी केली, परंतु त्याची जबाबदारी वळसे पाटलांकडे दिली गेली. अजित पवारांनी असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Mission Baramati : भाई भतीजा वाद अन् त्यातूनच भ्रष्टाचाराचा जन्म; बारामतीत निर्मला सीतारामन यांची पवारांवर टीका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.