Hinjawadi News: घरी आल्याचा जाब विचारल्याने एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – घरी आलेल्या मेहुण्याला घरी येण्याचा जाब विचारला, त्यावरून मेहुण्याने आरडाओरडा करत शिवीगाळ आणि दमदाटी करून चाकूने मारून जखमी केले. याबाबत मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 12) सकाळी साडेसात वाजता बाणेर येथे घडला.

अमित अशोक बस्तवडे (रा. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या मेहुण्याचे नाव आहे. याबाबत सुनील सुरेंद्र निटवे (वय 42, रा. बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निटवे यांच्या घरी त्यांचा आरोपी मेहुणा आला. त्यावर ‘तू आमच्याकडे कशाला आला’ असे निटवे यांनी विचारले. त्यावरून आरोपी अमित जबरदस्तीने घरात आला. त्याने मोठमोठ्याने आरडा ओरडा करून शिवीगाळ करत दमदाटी केली.

निटवे आणि त्यांच्या मित्रांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने अमितला घराबाहेर काढले. लिफ्टमधून खाली जात असताना अमितने निटवे यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.