Assam Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी आसाम हादरले; इमारतीला तडे आणि अनेक ठिकाणी पडझड

एमपीसी न्यूज – आसाम राज्यात आज सकाळी 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. त्याचबरोबर उत्तर बंगाल आणि इतर राज्यातही भूकंपाचे धक्के जाणवले.

यावेळी आसाम राज्याचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनीही या घटनेचा आढावा घेतला. त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामध्ये भूकंपमामुळे काही इमारतींचे नुकसान झाल्याचं दिसतं.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. पहिल्या तीव्र झटक्यानंतर नंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले. एक 7 वाजून 55 मिनिटाला तर त्यानंतर थोड्या वेळाने दुसरा. भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता पहिल्या धक्क्याच्या तुलनेत कमी होती. 7 वाजून 55 मिनिटांनी बसलेला झटका 4.3 रिश्टर स्केल, तर दुसरा 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ट्विट करून सांगितलं की, राज्यात भीषण भूंकप झाला आहे. सर्वजण सुरक्षित असावेत अशी प्रार्थना करतो आणि सर्वांना दक्ष रहावं असंही आवाहन त्यांनी केलं. सध्या सर्व जिल्ह्यांतून माहिती घेतली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याआधी 5 एप्रिलला सिक्किमममध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी होती. आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. तर भूकंपाचे केंद्र भारत-भूटान सीमेजवळ होतं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.