Assam Assembly Election Results 2021 : आसाममध्ये भाजपची मुसंडी, ४३ जागांवर आघाडी

0

एमपीसी न्यूज : आसामसहित पाच राज्यांच्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून ४३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आघाडी २० जागांवर पुढे आहे.

_MPC_DIR_MPU_II

दुसरीकडे आसामन जातीय परिषद (AJP) तीन जागांवर बपुढे आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार पोस्टल बॅलेट उघडण्यात आले आहेत. सध्या राज्यात ३३१ केंद्रांवर मतमोजणी सुरु असून मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत.

सध्या भाजपकडून आपली सत्ता कायम राखण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रचारात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं होतं. यापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या विजयाचं भाकित करण्यात आलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment