Assam Flood : देश उन्हाने त्रस्त असताना आसाममध्ये पावसाने केला विध्वंस

एमपीसी न्यूज : राजधानी दिल्ली, यूपीसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यांतील (Assam Flood) लोक सध्या कडक उन्हामुळे हैराण झाले आहेत. त्यांना उन्हाचा त्रास होत आहे. आता पाऊस लवकर येण्याची प्रतीक्षा आहे. पण, देशाचा एक भाग असाही आहे; जिथे उष्मा नाही, पूर आणि पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. तिथे सर्वात मोठा विध्वंस सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. 

लहान मुलांच्या खेळण्यांप्रमाणेच रेल्वेच्या बोगी डोंगराळ भागात पलटी झाल्या. आजूबाजूला पाणी आणि चिखल पसरला आहे.  दोन दिवसांपूर्वी जो रेल्वे प्लॅटफॉर्म दिसत होता; आता तो चिखलात बुडाला आहे.

 

Assam Flood 1

आसाममधील 20 जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे रेल्वे आणि रस्ते यांचा संपर्क तुटला आहे. सोशल मीडियावर लोक आसाममधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करत आहेत.

दिमा हासाओ हिल जिल्ह्याचा देशाच्या इतर भागाशी संपर्क तुटला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत किमान 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे, की ”होजईमधील 78,157 आणि कछारमधील 51,357 लोकांना पुराचा फटका बसला आहे.”

Mumbai Blast 1993 : मुबंई 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अखेर अटकेत

जोरदार भूस्खलन आणि संततधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचले (Assam Flood) असल्याची माहिती ईशान्य सीमा रेल्वेने दिली आहे. आसामच्या लुमडिंग-बदरपूर हिल विभागात दोन दिवसांपासून दोन गाड्या अडकल्या होत्या. हवाई दलाच्या मदतीने सुमारे 2800 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दक्षिण आसाम, त्रिपुरा आणि मिझोरामसाठीचे रेल्वे मार्ग गेल्या 2 दिवसांपासून बंद आहेत.

Assam Flood 2

गुवाहाटीतील बहुतांश भागात चार-पाच दिवसांपासून पाणी साचले आहे. शुक्रवारपासून राज्यभरात पाऊस पडत आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांवर चिखल साचल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुवाहाटी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक ए. के. भगवती यांनी शहरी पुरावर खूप अभ्यास केला आहे. ते म्हणाले की, ”ज्या भागात पूर आणि पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे ते एकेकाळी पाणथळ होते. शहर वाढल्याने सखल भागात बांधकामेही वाढली. जलद शहरीकरणामुळे पाणथळ जागा कमी झाल्या आणि काँक्रीट क्षेत्र वाढले ज्यामुळे शहरात पूर (Assam Flood) आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.