Pune Crime News : पुण्यात एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडगाव शेरी परिसरात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून वडगाव शेरी येथील हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. शाळेच्या आवारातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, येरवडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वडगाव शेरी येथील एका शाळेच्या आवारात आज सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित मुलगी शाळेत असताना आरोपीने शाळेत जाऊन हत्याराने तिच्यावर वार केले. या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येरवडा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.