Pune News : येरवड्यात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

एकाला अटक

एमपीसी न्यूज : पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील क्षीरसागर हॉल जवळ 16 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मोहम्मद मन्सूर उर्फ बब्बू जैनुद्दीन बागवान (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार चार जणांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्तियाक अन्सारी याला अटक करण्यात आली आहे तर शाहरुख अन्सारी इम्तियाज अन्सारी आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी ची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्याच भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादिवर हा हल्ला केला आहे. 16 फेब्रुवारी च्या रात्री मित्रांसोबत लक्ष्मीनगर येथे गप्पा मारत थांबलेला असताना आरोपींनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. कोयत्याने त्याच्या डोक्यात, डाव्या हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.