Indapur News : लग्नास नकार दिल्यामुळे गुप्तांगावर वार

मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज : मुलीसोबत लग्न करण्यासाठी नकार देणाऱ्या व्यक्तीवर तिघा जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्याच्या गुप्तांगावर पोटावर धारदार शस्त्राने वार केले. नामदेव बालाजी सकट (वय 45) जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. वालचंदनगर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे हा प्रकार घडला.

प्रकाश नामदेव मोहिते (वय 50) अनील शिवाजी गुळीक (वय 28) भाऊ उर्फ भावड्या नामदेव मदने (33) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मोलमजुरी करून उपजीविका भागवतात. बुधवारी नेहमीचे काम झाल्यानंतर ते शेळगाव येथे मित्राच्या घरी गेले होते. यावेळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी आरोपी प्रकाश मोहिते याने त्याच्या नांदत नसलेल्या मुलीशी लग्न करण्याचा हट्ट नामदेव सकट यांच्याकडे धरला. परंतु सगळ्यांनी त्याला नकार दिला.

त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी नामदेव सकट यांच्या गुप्तांगावर, पोटावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर नामदेव सकट यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.