Pune News: उसन्या पैशाच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज : उसन्या पैशाच्या वादातून एका पस्तीस वर्षीय व्यक्तीवर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वैदुवाडी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी साबीर रशीद सय्यद (वय 35) यांनी फिर्याद दिली असून आरोपी अखिल सय्यद (वय 42) यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी यांनी आरोपी कडून काही पैसे उसने घेतले होते. त्यातील 40 हजार रुपये परत देणे बाकी होते. हे पैसे लवकरात लवकर पाहिजे असे म्हणून आरोपीने चाकूने फिर्यादीच्या छातीवर, पोटावर, पाठीवर आणि गुप्तांगाच्या खाली वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.