Aslam Bagwan : सामाजिक कार्यकर्ते असलम इसाक बागवान यांना मारहाण

एमपीसी न्यूज : इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप या संस्थेचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते असलम इसाक (Aslam Bagwan) बागवान यांना पालिकेजवळ मारहाण झाली असून जिवे मारण्याच्या उद्देशाने माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्याकडून सुपारी घेतलेले गुंड पाठविल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. असलम बागवान यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

24 जून रोजी ही घटना घडली. उपचारांनंतर बागवान यांनी 25 जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता निषेध रॅली आयोजित करण्यात आली आहे. कोंढव्यातील डी एड कॉलेज ते शीतल पेट्रोल पंप या मार्गावर ही निषेध रॅली मार्गक्रमण करणार आहे.

Aslam Bagwan

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक गफूर पठाण,त्यांचे साथीदार अझर पठाण, कलीम पठाण, रिझवान पठाण यांच्याविरुद्ध कलम 323, 504,506, 427, 34 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

अशोका म्युज शेजारील भैरोबानाला नाला येथे अनधिकृतपणे सिमेंटचे पाईप टाकून रस्ता करत असल्याने या विरुद्ध समाजसेवक असलम इसाक बागवान (Aslam Bagwan) यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात तक्रार द्यायला बागवान हे या तक्रारी बाबत पाठपुरावा करायला बांधकाम विभाग, सावरकर भवन येथे गेले असता गफूर पठाण यांनी शिवीगाळ केली आणि नंतर गंधर्व हॉटेल येथे बोलावून साथीदारांकरवी मारहाण केली. या बरोबरच पत्रकार रियाज मुल्ला यांनी या प्रकरणाची सत्यता जनतेपर्यंत बातमीच्या माध्यमातून प्रसिद्ध केली म्हणून नगरसेवक गफूर पठाण व त्यांच्या साथीदार हे या पत्रकारास धमकी देत आहेत. पत्रकार रियाज मुल्ला यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे,असे बागवान यांनी सांगितले. मुल्ला हे एका युट्यूब चॅनेलचे प्रमुख आहेत.

या नगरसेवकाने सत्तेचा गैरवापर करून अनेक गैरप्रकार केलेले आहेत.अनधिकृत बांधकामांना अभय देणे, पुणे मनपाची विजचोरी, अनधिकृत बॅनरबाजी, कोविडचे नियम मोडून साजरा केलेले वाढदिवस, तसेच जातीचा खोटा पुरावा देवून केलेली जनतेची व पुणे महानगरपालिका यांची केलेली फसवणूक हे त्यापैकी काही गैरप्रकार आहेत,असे बागवान यांनी पत्रकात म्हटले आहे.

Kamshet : विजेच्या लपंडावामुळे व्यापारी, नागरिक हैराण

कोंढव्यात अशोका म्यूज या ठिकाणी नाल्याचे पात्र कमी करण्यात आला असून येथे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन स्थानिक नागरिकांचे मालमत्ता व जीवितहानी तसेच इतर नुकसान होण्याची मोठी शक्यता या पावसाळ्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे हे अनधिकृत रस्ता त्वरीत कारवाई करून काढून टाकावे तसेच हा रस्ता करताना पुणे मनपाची सुरक्षा भिंत तसेच ज्या प्लॉटसाठी रस्ता केला जात आहे, तेथील जुनी शेकडो झाडांचे कत्तल केल्याने गफूर पठाण व अन्य साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाचे पत्र दिल्याच्या रागातून गफूर पठाण यांच्या गुंडानी सापळा रचून तसेच असलम बागवान (Aslam Bagwan) यांचा पाठलाग करून जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला, असा आरोप बागवान यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.