Pune : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा निधी सुपूर्द करा- सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाने नगर विकास मंत्रालयामार्फत खडकी कॅन्टोन्मेंटला जाहीर केलेला निधी लवकरात लवकर सुपूर्द करावा, अशी मागणी शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी ही मागणी केली.

महाराष्ट्र शासनाने नगर विकास मंत्रालयामार्फत राज्यातील ७ कॅन्टोन्मेंट बोर्डांना विकास कामांसाठी 5 कोटींचा विकास निधी मंजूर केला आहे. यामध्ये खडकी, पुणे, देहू रोड, अहमदनगर, औरंगाबाद, देवळाली(नाशिक), कामठी (नागपूर) या कॅन्टोन्मेंटचा समावेश आहे.

या बाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रस्ताव सदर केला असून तो प्रशासकीय छाननी नंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित आहे. स्वाक्षरी झाल्यास निधी कॅन्टोन्मेंट बोर्डांना उपलब्ध होऊ शकणार आहे. तो लवकरात लवकर उपलब्ध व्हावा, अशी मागणी सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.