Pimpri News : कोकणातील पूरग्रस्तांसाठी मावळ युवा सेनेकडून 3 ट्रक साहित्याची मदत 

चिपळूण, खेडसाठी दिला मदतीचा हात  

एमपीसी न्यूज : राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण  सरदेसाई, शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना मावळ लोकसभच्या वतीने चिपळूण आणि खेड तालुक्यातील पूरग्रस्त बांधवांना  कपडे आणि जिवानावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. 

युवा सेनेच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत चिपळूण आणि खेड तालुक्यातील पूरग्रस्त बांधवांना सावरण्यासाठी 3 ट्रक अन्नधान्य किट – नवीन कपडे व 600 बिस्लेरी पाण्याचे बॅाक्स देण्यात आले.

ही सर्व मदत घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील  युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी चिपळूण व खेड येथे दाखल झाले.

ही सर्व मदत योग्यरित्या गरजु कुटुंबापर्यंत पोहचावी यासाठी शिवसेना आमदार भास्कर जाधव, आमदार योगेश कदम व चिपळूण येथील युवा सेनेचे पदाधिकारी उमेश खताते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

युवासेना संपर्कप्रमुख राजेश पळसकर, जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, पिंपरी चिंचवड शहर समन्वयक रुपेश कदम, उपशहर अधिकारी राजेंद्र तरस, माऊली जगताप, निलेश हाके, मावळ तालुका पदाधिकारी विशाल दांगट पाटील, तसेच युवासेना मावळ,पिंपरी-चिंचवड येथील युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी युवा सेनेकडून दानशूर नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तसेच युवा सेना पदाधिकाऱ्यांनीही या मदतकार्यात खारीचा वाटा उचलला. त्यामुळे भरीव स्वरूपातील मदत पूरग्रस्तांना करणे शक्य झाल्याची भावना युवा सेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले व पिपंरी-चिंचवड शहर अधिकारी विश्वजीत बारणे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.