Pune : महापालिकेची केरळला 1 कोटी 67 लाखांची मदत

एमपीसी न्यूज – पूरग्रस्त केरळला पुणे महापालिकेच्या नगरसेवकांच्या यावर्षीच्या अंदाजपत्रकातील वॉर्डस्तरीय निधीतून एक लाख रुपये मदत देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे 1 कोटी 67 लाख रुपयांची आर्थिक मदत पुणे महापालिका केरळला करणार आहे.

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे 400 नागरिकांना प्राण गमवावे लागले. लाखो नागरिक बेघर झाले, तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली. पूरग्रस्त केरळा पुणे महापालिकेच्या नगरसेवकांच्या यावर्षीच्या अंदाजपत्रकातील वॉर्डस्तरीय निधीतून एक लाख रुपये देण्याचा प्रस्ताव सभागृहनेते श्रीनाथ भिमाले , उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,  नगरसेवक उमेश गायकवाड यांनी दिला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

तसेच पुणे महापालिकेकडून केरळ राज्याला एक कोटी रुपयांची मदत करण्यात यावी याबाबतचा निर्णय महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घेऊन करावा.  या प्रस्तावाला देखील मान्यता दिल्याचे योगेश मुळीक यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.