Pimpri : कासारवाडी दुर्घटनेतील कुटुंबाला मदत 

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबाची भेट घेऊन पिंपरी विधानसभा युवा सेनेतर्फे त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, अॅड. अजित बोराडे, उपविभाग संघटक सनी कड, ओंकार जगदाळे, रवी नगरकर, नंदकुमार देवकर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापिलाकेच्यावतीने कासारवाडी येथे दि. ५ मे रोजी ड्रेनेजचे काम सुरु होते. खोदकामामध्ये शेजारील इमारतीची भिंत कोसळली. त्याखाली सापडून लोकेश ठाकूर या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.