एमपीसी न्यूज – वडगाव मावळ ( Vadgaon Maval) येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाचा कारभार हा रामभरोसे सुरु असल्याचे चित्र आहे. कारण भ्रष्ट अधिकाऱ्याची हकालपट्टी झाल्यापासून मागील दोन महिन्यापासून या कार्यालयात कोणी फिरकलेले नाही, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनी केला आहे.
नाईक म्हणाले की, राज्य मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून भ्रष्ट अधिकारी विठ्ठल सुर्यवंशी यांचे निलंबन झाले. तेव्हा पासून सहाय्यक निबंधक कार्यलयाचा कारभार हा प्रभारीत सुरु आहे. तेथे सध्या प्रभारी म्हणून काम पाहणारे एस.बी. घुले हे मागील अठवडाभरापासून कार्यालयात दिसले नाहीत. मी रोज जनतेच्या समस्या घेऊन येथे येतो मात्र कार्यालयात कोणी नसते. इथल्या इतर कर्मच्याऱ्यांशी बोलले असता आम्हाला उद्धट उत्तरे मिळाली आहेत.
Bavdhan News : भर दिवसा घरातून 65 ग्रॅम वजनाचे दागिने अन साहित्य चोरीला
असेच सुरु राहिले तर जनता कोणाकडे जाणार कामासाठी, त्यांच्या अनुपस्थीतीमुळे अनेकांची कामे आज रखडली आहेत. यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही याबाबत तक्रार केली असून यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. सहाय्यक निबंधक पद हे महत्तवाचे पद असून ते मागील दोन महिन्यांपासून प्रभारी राहत असेल तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे, अशी खंतही प्रदिप नाईक यांनी व्यक्त केली.