Akurdi News : अस्तित्व फाऊंडेशनच्या वतीने आकुर्डीत शनिवारी भव्य रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – अस्तित्व फाऊंडेशनच्या वतीने आकुर्डीत शनिवारी (दि.02) भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. फाऊंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या शिबिरात एक हजार युनिटस् रक्त संकलित करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

खंडोबा देवस्थान सांस्कृतिक हॉल, आकुर्डी चौक याठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदान शिबिरात सहभागी होता येणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी फाऊंडेशनच्या वतीने एक व्हॉटस्अप ग्रुप तयार करण्यात आला आहे. यामाध्यमातून आत्तापर्यंत 450 लोकांनी नोंदणी केल्याचे फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी होणा-या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

रक्तदान शिबिरासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटस्अप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जा.

https://chat.whatsapp.com/DdpkS5ZkodE9bn8IUjnauH

अधिक माहितीसाठी संपर्क – 7720001488

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.