ASUSE survey : अनइनकॉर्पोरेटेड सेक्टर इंटरप्राईजेसचे वार्षिक सर्वेक्षण ऑक्टोबर 2022 पासून सुरू

एमपीसी न्यूज : अनइनकॉर्पोरेटेड सेक्टर इंटरप्राईजेस (ASUSE survey) चे वार्षिक सर्वेक्षण ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल आणि ते एक वर्ष कालावधीचे आहे. ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत टॅब्लेट वापरून डेटा संकलनाचे कार्य क्षेत्रीय कार्यालय, पुणे द्वारा केले जाईल. अशी माहिती आलोक कुमार संचालक, आलोक कुमार, संचालक आणि क्षेत्रीय प्रमुख, राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय (NSO), आकुर्डी पुणे यांनी दिली.

राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय (NSO), क्षेत्रीय संकार्य प्रभाग (एफओडी), प्रादेशिक कार्यालय, पुणे द्वारे अनइन्कॉर्पोरेटेड सेक्टर एंटरप्रायझेस (ASUSE) च्या वार्षिक सर्वेक्षणासाठी तीन दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षण शिबिर आकुर्डी येथे आयोजित केले आहे. या शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलताना अलोक कुमार यांनी ही माहिती दिली. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आलोक कुमार, संचालक, शिर्के श्रीनिवास विजय, उपसंचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), क्षेत्रीय कार्य विभाग (FOD), रा.सा.का.(क्षे.सं.प्र) प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या हस्ते झाले. तसेच या कार्यक्रमात हनुमंत माळी, प्रादेशिक सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनाय महाराष्ट्र शासन आणि पी.बी.पाटील, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी,जळगाव व नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग, महाराष्ट्र शासन आदी मान्यवर उपस्थित होते.

हे सर्वेक्षण देशभरात 8692 गावे आणि 7888 शहरी गटांमध्ये केले जात आहे ज्याची निवड सांख्यिकीय नमुने घेण्याच्या तंत्राचा वापर करून करण्यात आले आहे.(ASUSE survey) हे सर्वेक्षण केवळ उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातील असंघटित बिगर कृषी आस्थापनांच्या आर्थिक आणि परिचालन वैशिष्ट्यांसाठी समर्पित असेल. असंघटित क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे, ज्यामध्ये मोठ्या अस्थापनाचा समावेश होतो व याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार ही निर्माण होतो याशिवाय, देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) त्याचे योगदान देखील महत्त्वपूर्ण आहे. या सर्वेक्षणात गोळा केलेला हा डेटा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या राष्ट्रीय लेखा विभागाला (NAD) राष्ट्रीय खात्यांच्या (GDP) महत्त्वाच्या घटकांची गणना करण्यास मदत करेल.

 

Maval News :  डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रेणुका वाडेकर 

 

या फेरीच्या एंटरप्राइझ शेड्यूलमध्ये समाविष्ट केलेले खास तीन अंकी उत्पादन कोड NAD ला ‘पुरवठा-वापर’ सारणी तयार करण्यासाठी सर्वेक्षण परिणामांचा वापर करण्यास देखील मदत करतील. ASUSE 2022-23 दरम्यान गोळा केला जाणारा डेटा विविध मंत्रालये, संस्था आणि सर्वसाधारणपणे वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करेल. सदरील तीन दिवसीय प्रशिक्षण हे सर्वेक्षणाच्या व्याख्या, संकल्पना, (ASUSE survey) क्षेत्रीय कार्याच्या तांत्रिक बाबी आणि टॅब्लेट वापरून फील्ड प्रशिक्षण यावर तपशीलवार चर्चा करण्यासाठी समर्पित असेल. प्रादेशिक कार्यालय पुणे व उपप्रादेशिक कार्यालय कोल्हापूर व सोलापूर येथील सुमारे 50 अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.

प्रशिक्षणादरम्यान, NSO कडून सर्वेक्षणासाठी त्यांच्या घरी किंवा आस्थापनांना भेट देणाऱ्या सर्वेक्षण प्रगणकांना क्षेत्रीय कार्य दरम्यान लोक आणि आस्थापनांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. सध्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाची इतर सर्वेक्षणे देखील आयोजित करत आहे.(ASUSE survey) जसे की आयुष (आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा/आमची आणि होमिओपॅथी), व्यापक वार्षिक मॉड्यूलर सर्वेक्षण, नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण, नियतकालिक श्रमिक सर्वेक्षण खर्चाचे सर्वेक्षण आणि उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण इ.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.