Chinchwad News : बिजलीनगर येथे टोळक्याने तलवारी नाचवत केली वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – बीजलीनगर चिंचवड येथे वाहनांची तोडफोड झाल्याची घटना आज (गुरुवारी, दि. 13) सकाळी उघडकीस आली. टोळक्याने हातात तलवारी नाचवत वाहने फोडली असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीजलीनगर येथील ओम कॉलनीमध्ये रात्री उशिरा काहीजण दोन वाहनांमधून आले. त्यांच्या हातात तलवारी होत्या. ओम कॉलनीमध्ये रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या सात वाहनांची टोळक्याने तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिक व वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विनाकारण टोळक्याकडून वाहने फोडली जात असल्याने नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.