Chakan : जमिनीची मोजणी करताना नायब तहसीलदारांना शिवीगाळ

एमपीसी न्यूज -शासकीय अधिका-यांसह जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांना एकाने शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी अकराच्या सुमारास चाकण येथे घडली.

नायब तहसीलदार राजेश किसनराव कानसकर (वय 40) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप सुदाम शेवकारी (वय 50, रा. आंबेठाण चौक, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कानसकर खेड तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आहेत. ते आंबेठाण येथील एका जागेची मोजणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत चाकणचे तलाठी आचार्य चाकाण, कोतवाल घाडगे, भूमापक साबळे, भगत, म्हस्के आदी होते. आरोपी संदीप यांच्या शेजारी असलेली जमीन मोजण्याचे काम सुरु होते. त्यावेळी शेजारच्या जमिनीची हद्द आपल्याकडे सरकल्याच्या वादातून संदीप याने नायब तहसीलदार कानसकर यांच्याशी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ केली. ‘तू मला शिकवू नकोस’ असे म्हणत बघून घेण्याची धमकी देखील दिली. याबाबत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. याचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.