Chakan News : खंडोबामाळ येथे पिस्तूलाच्या धाकाने दहशत पसरवली

पोलिसांनी अडवले असता पोलिसांनाही धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – लोकवस्तीत पिस्तूलाच्या धाकाने दहशत निर्माण करून दुकाने बंद करण्यास तसेच नागरिकांचे दैनंदिन व्यवहार करण्यास मनाई केली. याबाबत कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता पोलिसांची गचांडी पकडून पाहून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 19) रात्री पावणे सात वाजता खंडोबामाळ, चाकण येथे घडला.

गौरव मच्छिन्द्र डोंगरे (वय 23, रा. चाकण) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे (रा. रासे, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक विठ्ठल बाजीराव सानप (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील याच्या सांगण्यावरून आरोपी गौरव याने शुक्रवारी रात्री पावणे सात वाजताच्या सुमारास खंडोबामाळ येथे पिस्तूलाच्या धाकाने दहशत निर्माण केली. परिसरातील दुकानदारांना त्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडून नागरिकांना त्यांचे दैनंदिन व्यवहार करण्यास रोखले.

याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस घटनास्थळी गेले. गौरव याच्यावर कारवाई करत असताना त्याने पोलीस नाईक विठ्ठल सानप यांची गचांडी पकडली. तसेच त्यांना पाहून घेण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी गौरव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 40 हजार 500 रुपयांचे एक पिस्टल आणि एक जिवंत कडतुस जप्त केले.

गौरव याने स्वप्नील याच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याने दोघांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 353, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम 7, भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 (25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव याला अटक करण्यात आली असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.