Pune : दुचाकीवर रात्री घरी निघालेल्या जेष्ठास आडवून चामडी पट्ट्याने मारहाण

एमपीसी न्यूज : दुचाकीवर रात्री घरी निघालेल्या जेष्ठास आडवून चामडी पट्ट्याने मारहाण केल्याची घटना काल सोमवारी(दि.22) रात्री 10 च्या दरम्यान औंधमधील ब्रोमेन चौक येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोरील सिग्नलला घडली.

याप्रकरणी, राजीव शर्मा (वय 56, रा.वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजीव शर्मा हे त्यांच्या दुचाकीवरून रात्री 10 च्या दरम्यान घरी निघाले होते. दरम्यान पाठीमागून दोन दुचाकी आल्या आणि त्यावरील पाच अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना चामडी पट्ट्याने आणि हाताने मारहाण केली आणि तेथून पसार झाले. पाच अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.