New Delhi : राजकारणातील ‘अटल’ रत्न निखळले

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (वय 93) यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवार) सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झाले. मागील चोवीस तासांपासून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 11 जून 2018 पासून एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. 

अटल बिहारी वाजपेयी यांना मागील 66 दिवसांपासून दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना मूत्रविकार, छातीत दुखणे आणि — याबाबत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेहाचा देखील त्रास होता. 15 ऑगस्ट रोजी त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या दीर्घायुष्यासाठी अहमदनगर मधील विशाल गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच लखनऊ, भोपाळसह देशातील विविध भागात वाजपेयी यांच्या चाहत्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.