Pune : अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृती साठी पुण्यात अभिषेक 

एमपीसी न्यूज –  भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना दीर्घायुष्य लाभो आणि अटलजी ची प्रकृती चांगली होवो या साठी पुण्यातील अप्पर इंदिरा नगर भागातील राजीव गांधी नगर मधील सामाजिक कार्यकर्ते व शिवरुद्र प्रतिष्ठाण चे राहुल पाखरे यांनी बिबवेवाडी मधील अप्पर  भागात महादेवाचा अभिषेक करून प्रार्थना केली.

या देशाला परमाणु सज्ज करणारे अटलजी यांची प्रकृती खालावली आहे त्यांची प्रकृती उत्तम व्हावी यासाठी राहुल पाखरे युवा मित्र परिवार च्या वतीने महादेवाला अभिषेक घालून अटलजी लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यात आली . यावेळी श्रीनाथ जोशी , गणेश पाखरे ,प्रकाश दिघे आणि बाकी मित्र परिवार उपस्थित होता .

_MPC_DIR_MPU_II

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली आहे.

देशाच्या राजकारण एक मितभाषी आणि कणखर नेतृत्व म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांना ओळखलं जातं. कारगिलची लढाई असो की भारताला अणुअस्त्रधारी देश बनवण्याच्या निर्णय, त्यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारत देशहिताचे असंख्य निर्णय घेतले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.