Pimpri: इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव

महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या उपसूचनेला महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले. त्यावेळी देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात अटलींचे नाव अजरामर राहील, अशा भावना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्‍त केल्या होत्या.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. नगरसेवक नामदेव ढाके यांनी याबाबतची उपसूचना मांडली. त्याला नगरसेवक सुरेश भोईर यांनी अनुमोदन दिले. त्याद्वारे हा विषय मंजूर करण्यात आला आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीच्या संवर्धनासाठी “नमामी गंगा’ हा नदीसुधार प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने मे. एचएसपी डेव्हलपमेंट ऍन्ड मॅनेजमेंट कन्सलटंट या सल्लागार संस्थेची नेमणूक केली होती. अहमदाबाद येथील साबरमती रिव्हर फ्रंन्ट प्रकल्पाचे काम या संस्थेने केले आहे. संबंधित संस्थेने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर तात्काळ या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.