Pune : अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी उद्या पुण्यात

एमपीसी न्यूज – देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी  प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आले.  हरिद्वार मधील भल्ला कॉलेज मधून त्यांची कलश यात्रा काढण्यात आली होती. सर्व विधी पार पडल्यानंतर वाजपेयींच्या मानसकन्या निमिता यांनी वाजपेयींच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या. दिल्ली येथील स्मृतिस्थळावर तीन वेगवेगळ्या कलशात अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. त्या अस्थी देशभरातील सुमारे 100 नदीमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत. 

त्यामुळे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचा कलश उद्या (गुरुवार, ता. २३ ऑगस्ट) सकाळी साडेदहा ते दुपारी ३ या वेळेत जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान, भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पालकमंंत्री गिरीश बापट सकाळी मुंबईहून पुण्याला अस्थी कलश आणणार आहेत. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.