Pune : अटलजी हे एक व्यक्ती नसून ते एक संस्था होते – डॉ. रघुनाथ माशेलकर 

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे  दीर्घ आजाराने आज (गुरुवार) सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झाले. मागील चोवीस तासांपासून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 11 जून 2018 पासून एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. ते 93 वर्षांचे होते.

अटलजी हे एक व्यक्ती नसून ते एक संस्था होते. व्यक्ती जातात मात्र संस्था राहतात त्यामुळे अटलजी संस्थेरूपी आपल्यात राहतील अशी प्रतिक्रिया शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे. अटलजी यांच्या विज्ञानाप्रती असलेल्या प्रेमाच्या आठवणींना माशेलकर यांनी उजाळा दिला. जय जवान जय किसान या घोषणेत भर घालत अटलजी यांनी जय विज्ञान असं केले. तर शास्त्रज्ञांना कामात स्वतंत्र केलं पाहिजे त्यांच्यावर नोकरशाहीचा दबाव नको अशी भूमिका अटल बिहारी वाजपेयी यांची होती डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देताना असे उद्गार काढले आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांना मागील 66 दिवसांपासून दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना मूत्रविकार, छातीत दुखणे आणि — याबाबत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेहाचा देखील त्रास होता. 15 ऑगस्ट रोजी त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.