Pune : अ‍ॅटॉस सिंटेल, एचएसबीसी, यार्डी संघाचे विजय

प्रथम स्पोर्टसच्या वतीने आयोजित पुणे आयटी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज – अ‍ॅटॉस सिंटेल, एचएसबीसी, यार्डी सॉफ्टवेअर या संघांनी प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

नेहरू स्टेडियमवर झालेल्या पहिल्या रोमहर्षक लढतीत अ‍ॅटॉस सिंटेल संघाने नॉर्दर्न ट्रस्ट संघावर तीन गडी राखून मात केली. यात नॉर्दर्न ट्रस्ट संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १४३ धावा केल्या. अ‍ॅटॉस सिंटेल संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात आठ धावांची गरज होती. यात पहिल्या तीन चेंडूंवर दोनच धावा निघाल्या. यानंतर चौथ्या चेंडूंवर महेश भोसले बाद झाला, तर पाचव्या चेंडूवर तिसरी धाव घेताना संदीप भगत धावबाद झाला. त्यामुळे अ‍ॅटॉस सिंटेलला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज होती. यात राज शहाने चौकार मारून अ‍ॅटॉस सिंटेलला विजय मिळवून दिला. त्या आधी सलामीवीर चिन्मय एम.ने ५५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७३ धावा केल्या.

यानंतर दुस-या लढतीत एचएसबीसी संघाने हरमन संघावर ३० धावांनी मात केली. यात गणेश मिसाळने ५५ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ९१ धावा केल्या. तिस-या लढतीत यार्डी सॉफ्टवेअर संघाने मास्टरकार्ड संघावर २२ धावांनी मात केली. यार्डी संघाने दिलेल्या १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मास्टरकार्ड संघाला ५ बाद १३० धावाच करता आल्या.

संक्षिप्त धावफलक  – १) नॉर्दर्न ट्रस्ट -२० षटकांत ४ बाद १४३ (सचिन चव्हाण ४४, जयेश एस. नाबाद २८, इर्शाद बेग २७, जय लोबे २३, चंद्रकांत मोरे २-४४, संदीप भागवत १-१६, म्रिणाल कुमार १-४०) पराभूत अ‍ॅटॉस सिंटेल – २० षटकांत ७ बाद १४७ (चिन्मय एम. ७३, सौरभ मांजरामकर २३, जयेश एस. २-२७, अमोद देशपांडे २-२९). सामानावीर – चिन्मय एम.

२) एचएसबीसी – २० षटकांत ५ बाद १६८ (गणेश मिसाळ ९१, अक्षय नायक २५, युवराज बागुल २४, अभिषेक धनावडे २-२८, विनोद अलाट १-२६) वि. वि. हरमन – २० षटकांत ५ बाद १३८ (योगेश एस. ४८, अभिषेक धनावडे ३४, विनोद अलाट २०, गणेश मिसाळ ३-२५, नलिन कम्बोज १-१५). सामनावीर -गणेश मिसाळ

३)  यार्डी सॉफ्टवेअर – २० षटकांत ३ बाद १५२ (स्वप्नील घाटगे नाबाद ८२, जीवन गोसावी नाबाद ४०, मंदार नायर १-१२, अभिजित परिदा १-१६) वि. वि. मास्टरकार्ड – २० षटकांत ५ बाद १३० (अभिजित परिदा नाबाद ४७, ईशान शेंडे २४, विकाससिंग २०, प्रमोद दावंडे २-२१, गौतम तुळपुळे १-१५). सामानावीर- स्वप्नील घाटगे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.