Pune : अ‍ॅटॉस सिंटेलचा डसॉल्टवर दणदणीत विजय

झेन्सर, टिएटो, व्हीएमवेअर संघांची चमक; प्रथम स्पोर्टसच्या वतीने पुणे आयटी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज – हर्षद तिडकेच्या आक्रमक अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर अ‍ॅटॉस सिंटेल संघाने प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत डसॉल्ट सिस्टिम संघावर ९९ धावांनी सहज मात केली. इतर लढतींत झेन्सर, टिएटो, व्हीएमवेअर संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवले.

पिंपरी-चिंचवडच्या टेल्को ग्राउंडवर झालेल्या लढतीत अ‍ॅटॉस सिंटेल संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६८ धावा केल्या. यात हर्षद तिडकेने २७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. त्याला मंजूनाथ आर. (३३) आणि सौरभ मांजरमकर (३२) यांनी चांगली साथ दिली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना डसॉल्ट सिस्टिमचा डाव १४.४ षटकांत ६९ धावांत संपुष्टात आला. अ‍ॅटॉसकडून संदीप भगत, संकेत त्रिवेदी, सौरभ मांजरमकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

नेहरू स्टेडियमवर झालेल्या दुस-या लढतीत झेन्सर संघाने मर्क्स संघावर सात गडी राखून सहज मात केली. गुरुराज बरगुंडी याने अचूक मारा करून मर्क्स  डाव १७.२ षटकांत ९१ धावांत गुंडाळला. गुरुराजने निम्मा संघ गारद केला. झेन्सरने विजयी लक्ष्य १२.४ षटकांत तीन गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले. तिस-या लढतीत टिएटो संघाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल संघावर १० धावांनी विजय मिळवला. टिएटोने दिलेले ११३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघाला ४ बाद १०२ धावाच करता आल्या. चौथ्या लढतीत व्हीएमवेअरने स्प्रिंगर नेचर संघावर दहा धावांनी विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक : १) अ‍ॅटॉस सिंटेल – २० षटकांत ९ बाद १६८ (हर्षद तिडके ५३, मंजूनाथ आर. ३३, सौरभ मांजरमकर ३२, मंदार जोशी ३-४२, सचिन पाटील २-२७) वि. वि. डसॉल्ट सिस्टिम – १४.४ षटकांत सर्व बाद ६९ (अंशूल गोस्वामी २७, मंदार जोशी १०, संदीप भगत २-८, संकेत त्रिवेदी २-२०, सौरभ २-५).

२) मर्क्स – १७.२ षटकांत सर्व बाद ९१ (वैभव महाडिक २४, दिनेश वाडकर १९, गुरुराज बरगुंडी ५-७, अनिल त्रिपाठी ३-१८) पराभूत वि. झेन्सर – १२.४ षटकांत ३ बाद ९५ (भारत झव्हेरी ३३, नीयत माथूर नाबाद २९, अभिषेक राय २-१८).

३) टिएटो – २० षटकांत सर्व बाद ११२ (इम्तियाझ शेख ३५, शुभम संगोळे २३, प्रणव राजळे ४-१९, गणेश ३-११) वि. वि. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल – २० षटकांत ४ बाद ११० (सौरभ रवाळीया ३१, कुणाल फणसे २१, अंकित जैन १-२०, पुष्पेंद्र सिंग १-१२).

४) व्हीएमवेअर – २० षटकांत ९ बाद १४० (सौरभ वर्मा २५, विकास शितोळे २३, प्रसाद चौरे १८, राहुल नागडे २-२१, सतीश पाटील २-१८) वि. वि. स्प्रिंगर नेचर – २० षटकांत ७ बाद १३० (जयप्रकाश शिरोळे ३६, केतन कडू २०, दीपक जाधव २-२५, रोहितसिंग २-१३, अनिरुद्ध कुलकर्णी २-१९).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.