ATM theft : एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला कोंढवा पोलीसांनी अटक केली आहे. चोरटे हे कोंढवा भागातील हांडेवाडी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रा, (ATM theft) फायनान्स बँक व आय.सी.आय, पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन बुथ चोरीचा प्रयत्न करत होते.

रोहीत रामखिलवन मिश्रा (वय 24 रा. कोंढवा) व शिवम ओमकार तिवारी (वय 19 रा.उत्तरप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Chaturshringi Temple : चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मागील काही दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्रा, फायनान्स बँक व आय.सी.आय, पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन बुथ येथे चोरीचा प्रयत्न करत होते. मात्र सीसीटीव्ही सर्वीलन्स मुळे त्यांचा प्रयत्न फसला होता. ही टोळी पुन्हा चोरी करणार असल्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. (ATM theft) त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही वर नजर ठेऊन पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडले. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी  कटावनी, हातोडा,दुचाकी, स्क्रू ड्रायव्हर,ग्रँडर जप्त केले. आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांच्यावरील कोंढवा पोलीस ठाणे येथे दाखल असलेले पाच गुन्हे उघड झाले आहेत. याचा पुढिल तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.