Atrocity Agitation : ‘ॲट्रोसिटी’च्या कडक अंमलबजावणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे आंदोलन

एमपीसी न्यूज : दलित अत्याचार प्रतिबंधित कायद्याची (अट्रोसिटी) कडक अंमलबजावणी पोलीस आणि प्रशासनाकडून व्हावी यासाठी लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्च्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अट्रोसिटी   कायद्याचे वाचन करून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

तसेच यावेळी पोलीस आणि प्रशासनाचा घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्त्व रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले.

यावेळी बोलताना डंबाळे म्हणाले, दलित पीडितांना न्याय देण्यासाठी हा कायदा आहे परंतु या कायद्याचा वापर प्रभावी पोलीस प्रशासन करीत नाही त्यामुळे त्यांना या कायद्याचा अभ्यास व्हावा व त्यांनी करावा म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन केल्याचे सांगितले.

या आंदोलनात दलित कोब्राचे भाई विवेक चव्हाण, भीम छावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड, कष्टकरी पंचायतीचे नेते बाबासाहेब कांबळे, भीम आर्मीचे अभिजीत गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या स्नेहल कांबळे, अजय लोंढे, रिपब्लिकन पक्षाचे किरण भालेराव, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भोसले, अश्विन दोडके यासह पुणे शहरातील महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.