Bhosari : घराचा पत्ता न सांगितल्याने तरुणीवर वार

एमपीसी न्यूज – बालाजीनगर येथील एका टोळक्याला तरुणाने त्याच्या मित्राचा पत्ता सांगितला नाही. यावरून टोळक्याने तरुणासह त्याच्या घरच्यांना मारहाण केली. तर तरुणाच्या चुलत बहिणीच्या पायावर सत्तुरने वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 18) दुपारी साडेबाराच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथील बालाजी नगर झोपडपट्टीमध्ये घडली.

उस्मान हुसेन शेख (वय 40, रा. बालाजी नगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजय दुनघव, पवन शिरसाठ, आकाश शिरसाठ, चिंग्या, तम्मा, बाळ्या (पूर्ण नाव माहिती नाही) आणि अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आठ-दहा जणांचे टोळके बालाजी नगर मध्ये आले. त्यांनी उस्मान यांच्या पुतण्याला त्याच्या मित्राच्या घरचा पत्ता विचारला. तो पत्ता सांगण्यास पुतण्याने नकार दिला. या कारणावरून टोळक्याने त्याला मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या सर्व नातेवाईकांना देखील मारहाण केली. आरोपी बाळ्या याने उस्मान यांची मुलगी (मर्जीना) च्या पायावर सत्तुरने वार केले. यामध्ये मर्जीना गंभीर जखमी झाली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.