Pimpri : आज तुझी विकेट टाकतो म्हणत पिंपरीत तरुणावर खुनी हल्ला

दोघांना अटक

एमपीसी न्यूज – सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी सव्वानऊ वाजता भारतनगर, पिंपरी येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मतीश अकबर कुरेशी (वय 24), ओमकार मारुती कामत (वय 18) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह अनिस फिरोज शेख (वय 18), अमर सुरेश ओंबासे (वय 18), जय दिलीप बिरजे, बबलू दिलीप बिरजे (सर्व रा. भारतनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी सुरश कदम (वय 24, रा. भारतनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (दि. 4) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम भारतनगर येथील बिरजखाली मटन मार्केट जवळ नाष्टा करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपी अमर फिर्यादी कदम यांना म्हणाला, तुला माज आला आहे का? तू जय व बबलू भाईला खुन्नस देतो काय. आज तुझी विकेट टाकतो.’

अनिस याने कदम यांच्या पाठीवर कोयत्याने वार केला. कदम मटणाच्या दुकानाकडे पळत असताना आरोपींनी त्यांना खाली पाडून कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. खुनी हल्ला केल्यानंतर ‘जय बिरजे आणि बबलू बिरजे यांच्या नदी लागू नकोस. तुला आज जिवंत सोडत नाही’ अशी धमकी देऊन निघून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.