Pune: डॉक्टरांना ‘शस्त्र’ खाली ठेवायची वेळ येऊ देऊ नका- डॉ. अविनाश भोंडवे

कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने जीव धोक्यात टाकून डॉक्टर रूग्णांवर उपचार करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीत रात्रंदिवस काम सुरू आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना संकट काळात डॉक्टर जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्याकडून धमकीची भाषा वापरली जात आहे. डॉक्टरांवरील शाब्दिक हिंसाचार हा निषेधार्ह असून, आम्हाला शस्त्रे खाली ठेवायची वेळ येऊ देऊ नका, असा स्पष्ट इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे.

लातूर येथे एका डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याची सखोल चौकशी करून आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी ऑनलाइन पत्रकार परिषदेत करण्यात आली.

यावेळी डॉ. मंगेश पोटे, डॉ. सुहास पिंगळे, लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी उपस्थित होते. खासगी रुग्णालयांना शासनाने ठरवून दिलेले दर परवडणारे नाहीत.

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, पीपीई किट, जैव कचरा या सर्व खर्चात वाढ झाल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने जीव धोक्यात टाकून डॉक्टर रूग्णांवर उपचार करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीत रात्रंदिवस काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.