Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

एमपीसी न्यूज : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Sandeep Deshpande) सकाळी मॉर्निग वॉकला गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली.

Pune News : शनिवारी महावितरणमध्ये  ‘लाईनमन दिना’चे आयोजन

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यावर चार अज्ञातांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. (Sandeep Deshpande) त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने हल्ला करण्यात आला होता. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, त्यांच्या पायाला लागलं आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.