Chakan: पाणी विक्रेत्याला जिवे मारण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा

attack on water vendor in chakan fir file against three unidentified person

एमपीसी न्यूज- वाहनातून विक्रीसाठी पाण्याचे जार घेऊन जात असलेल्या युवकावर दुचाकीवरून आलेल्या तिघा अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. संशयित आरोपीनी वाहनाची तोडफोडही मोठ्याप्रमाणात केली. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री सव्वानऊच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील रासे फाट्यावर घडली.

नंदू राजापूरकर (वय 28, रा. रासे, ता. खेड) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन चाकण पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू  राजापूरकर हे पाण्याचे जार विक्रीचे काम करतात. ते सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता चाकण-शिक्रापूर रस्त्यावरुन जात होते. रासे फाट्याजवळ आले असता त्यांच्या गाडीला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवले आणि गाडी बाजूला घेण्यास सांगितले.

नंदू यांनी आपले वाहन बाजूला घेतले नाही. यावरून तिन्ही व्यक्तींनी चालकाच्या बाजूच्या काचा कोयत्याने फोडल्या. काच फुटून नंदू यांच्या डोक्यात कोयता लागला. त्यानंतर नंदू हे गाडी थांबवून तेथून पळू लागले. त्यावेळी संशयित आरोपींनी नंदू यांच्या डाव्या आणि उजव्या हातावर कोयत्याने सपासप वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.