Pimpri crime : जुन्या भांडणातून तरूणीवर वार

एमपीसी न्यूज –  जुन्या भांडणातून 24 वर्षीय तरुणीवर वार करण्यात आले आहेत.(Pimpri crime) ही घटना पिंपरीतील भाजी मंडईजवळ शुक्रवारी (दि.4) घडली.

तरुणीने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली असून लड्या उर्फ हर्ष अमर बहोत (वय 19 रा. पिंपरी) याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Indrayani college : इंद्रायणी महाविद्यालयातर्फे संजीवनी बालिकाश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहण्यास आहेत. त्यांच्यात जुने भांडण झाले होते. त्यातून फिर्यादी यांनी आरोपीवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.(Pimpri crime) त्याचा राग मनात धरून आरोपीने शुक्रवारी फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादी यांच्या डोक्यात, कानावर, हातावर जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले.यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपीवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.