Talegaon: किरकोळ भांडणातून तरुणावर शस्त्राने वार

attack on youth after minor quarrel in maval taluka talegaon

एमपीसी न्यूज- किरकोळ भांडणाच्या कारणावरून तरुणावर सुरीसारख्या धारदार शस्त्राने वार करुन एकाला गंभीर जखमी करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.26) रात्री पावणे अकरा वाजता मावळ तालुक्यातील आंबी गावात घडली.

गोपाळ ताराचंद देवनारे (रा. आंबी, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी अर्चना गोपाळ देवनारे (वय 24) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवन (पूर्ण नाव माहिती नाही. रा. आंबी, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी आंबी येथे जितू घोजगे यांच्या खोल्यांमध्ये भाड्याने राहतात. मंगळवारी रात्री जखमी गोपाळ आणि आरोपी पवन यांच्यात अचानक भांडण सुरू झाले.

आरोपी पवन याने सुरीसारख्या धारदार शस्त्राने गोपाळ यांच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले. यामध्ये गोपाळ गंभीर जखमी झाले. यानंतर आरोपी पवन घटनास्थळावरून पळून गेला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.