Hinjawadi News : तरुणावर कु-हाडीने वार; तलवारीने मारण्याचा प्रयत्न, गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून एका तरुणावर कु-हाडीने वार केले. त्यानंतर तलवारीने मारण्याचा प्रयत्न करून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 16) विनोदेवस्ती, वाकड येथे घडली. याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश कृष्णा खेंगरे (रा. चिंचवड), महेश रमेश गवारे (रा. थेरगाव), सर्जेराव चंद्रकांत देवकर (रा. देवकरवस्ती, वाकड), मयूर देवकर (रा. वाकड), आशिष पवार (रा. थेरगाव) आणि इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरज अरुण भूमकर (वय 29, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा मित्र प्रदीप भुसारे कुठे आहे याची माहिती घेण्यासाठी फोन केला. त्याचा आरोपींना राग आला. आरोपी आकाश खेंगरे याने इतर साथीदारांना बोलावले. खेंगरे याने फिर्यादी यांच्यावर कु-हाडीने वार केला. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तू मेला पाहिजेस’ असे म्हणत मयूर देवकर तलवार घेऊन आला. त्यावेळी आकाश खेंगरे म्हणाला की, ‘तलवारीने काय मारतोस. गोळ्या घाल त्याला.’ त्यावेळी मयूर देवकर याच्या कमरेला पिस्तुल असल्याचे फिर्यादी यांनी पाहिले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.