Pune : निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा पोलीस ठाण्याच्या आवारात पेटवून घेण्याचा प्रयत्न (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- पोलीस तक्रार घेत नसल्याच्या कारणावरून निलंबित पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रेरणा दत्तात्रय मदने असे या महिलेचे नाव आहे.

प्रेरणा मदने यांनी 3 एप्रिल रोजी हडपसर पोलिसात एक तक्रार दिली होती. परंतु अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही त्यावर कारवाई केली नाही असा आरोप त्यांनी केला. आज सकाळी त्या हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात आल्या आणि त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

प्रेरणा मदने या निलंबित सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने यांच्या पत्नी आहेत. पोलीस कर्मचारी राहुल वेताळ यांनी आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  परंतु पोलीस वेताळ यांच्यावर कारवाई न करता माझ्यावर दबाव आणत आहेत, असा आरोप त्यांनी केला. माझ्यावर व माझ्या पतीवर खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवत आहेत. त्यामुळे जीवन संपवून घेणे हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.