Hinjawadi News: हिंजवडी येथे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटरचा दरवाजा उघडून मशीनचा पुढील भाग उचकटला. मात्र, चोरट्यांना संपूर्ण मशीन उघडता आले नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला.

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदे रोड, म्हाळुंगे येथे अज्ञात चोरट्यांनी अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात चोरटे अपयशी ठरले. ही घटना मंगळवारी (दि.11) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सुशांत रामचंद्र सातपुते (वय 32, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिताची कंपनीत नोकरी करतात. त्यांच्याकडे अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरची देखरेख करण्याची जबाबदारी आहे. नांदे रोडवर पीएमटी बस थांब्याजवळ असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएमचा मंगळवारी रात्री दरवाजा बंद होता.

अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटरचा दरवाजा उघडून मशीनचा पुढील भाग उचकटला. मात्र, चोरट्यांना संपूर्ण मशीन उघडता आले नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. चोरट्यांनी मशीनच्या कॅश काउंटरचा दरवाजा तोडून तीन हजार रुपयांचे नुकसान केले. मंगळवारी दुपारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.