Bhosari News : पत्ते खेळत बसलेल्या एकाला सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

0

एमपीसी न्यूज – मित्रांसोबत पत्ते खेळत बसलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी गुलाबपुष्प उद्यानासमोर गवळीनगर, टेल्को-भोसरी रोडवर घडली.

_MPC_DIR_MPU_II

अच्युत मधुकर राऊत (वय 50, रा. गुलाबपुष्प उद्यानासमोर गवळीनगर, टेल्को-भोसरी रोड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत सोमवारी (दि. 22) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुस्ताक सय्यद (वय 55, रा. गुलाबपुष्प उद्यानासमोर गवळीनगर, टेल्को-भोसरी रोड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गुलाबपुष्प उद्यानासमोर गवळीनगर, टेल्को-भोसरी रोडवर फूटपाथ लगत मित्रांसोबत मेंढीकोट पत्ते खेळत होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांच्या भोवती दोन वेळा चक्कर मारली. त्यानंतर ‘आज साल्याला खतमच करतो’ असे म्हणत राऊत यांच्या जवळ आला.

राऊत यांच्या पाठीमागून येऊन त्याने सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून ‘आज सोडतच नाही. खतमच करतो’ अशी धमकी देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment