Indapur News : वाळू माफियाचा महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. इंदापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू माफियांनी तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने मजूर वाळूमाफियांनी डोके वर काढल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.

याप्रकरणी शिलाजीत वामन सोनवणे,  स्वप्निल संजय आरडे, विकास नारायण आरडे यांच्यासह एकूण सहा जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण रामभाऊ वेडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार 5 जानेवारी रोजी इंदापुरातील हिंगणगाव हद्दीत घडला.

उजनी जलाशयातून वाळू चोरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार अरुण वेडे, मंडल अधिकारी हगारे हजारे जात असताना त्यांना समोरून एक वाळूचा ट्रॅक्टर जाताना दिसला. त्यांनी या ट्रॅक्टरला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या अंगावरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला आणि ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. दरम्यान फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आता ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला असता ट्रॅक्टरवरील एकाने ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीची पिन काढली. त्यानंतर वाळू भरलेली ट्रॉली सरकारी जीपवर येऊन धडकली. अधिकाऱ्यांनी वेळीच गाडीतून उड्या मारल्या त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.