Pimpri News : टाटा मोटर्स कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल कंट्रोल युनिट, कॉपर वायर चोरीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीतून एका चोरट्याने इलेक्ट्रिकल कंट्रोल युनिट आणि कॉपर वायर चोरून नेताना एकजण सापडला. ही घटना गुरुवारी (दि. 4) दुपारी कंपनीतील जे ब्लॉक मधील 13 नंबर लाईनमध्ये घडली.

_MPC_DIR_MPU_II

सयाजी लालासाहेब पवार (वय 55, रा. चिंचवड) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा शामराव नारखेडे (रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा याने टाटा मोटर्स कंपनीत काम करत असताना जे ब्लॉक मधील 13 नंबर लाईनमधून इलेक्ट्रिकल कंट्रोल युनिटचे 16 पार्ट आणि कॉपर वायरचे 500 नग असा एकूण एक लाख 23 हजार 672 रुपयांचा ऐवज चोरून नेण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या परस्पर हे कृत्य केल्याने याबाबत घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.