-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून कुटुंबीयांकडून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : अंतरजातीय विवाह केल्याच्या रागातुन आई, भाऊ आणि काका यांनीच भर रस्त्यात तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न केला. परंतु तरुणीच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी रस्त्यावर रविवारी हा प्रकार घडला.

याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीने तक्रार दिली असून त्यानुसार या तरुणीचा काका, भाऊ, आई आणि आईच्या दोन मैत्रिणी यांच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणीचे इंटरकास्ट लग्न झाले आहे. या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे चिडलेल्या काका ,भाऊ आणि आई यांना या तरुणीचे अपहरण करण्याचा प्लान आखला. आणि 20 जून रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी तरुणीने रिक्षामधून सासू आणि ननंद यांच्या सोबत जात असताना आरोपींनी तिच्या रिक्षाला कार आडवी लावली.

आणि तिला रिक्षातून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीची सासू आणि नणंद सोडविण्यासाठी आले असता त्यांना मारहाण करत फिर्यादीने जबरदस्तीने गाडीत टाकले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

परंतु फिर्यादीने चालत्या गाडीतून खाली उडी मारली आणि पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.