Chikhali Crime News : ‘मी घरकुलचा डॉन आहे’ म्हणत खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – ‘हातात कोयता घेऊन मी घरकुलचा डॉन आहेम्हणत वाहनांची तोडफोड करणाऱ्या खुनाचा प्रयत्न करणाया 18 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.23) रात्री दहा ते अकराच्या दरम्यान चिखलीतील घरकुल हौसिंग सोसायटीत घडला

याप्रकरणी घरकुल हौसिंग सोसायटीतील रहिवासी आकाश बालाजी गायकवाड (वय 29) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 18 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी (दि.23) रात्री दहा ते अकराच्या दरम्यान बिल्डिंग खाली आरडाओरडा सुरू असल्याने काय झालं आहे हे पाहण्यासाठी खाली आले. त्यावेळी आरोपी हातात कोयता घेऊन ‘मी घरकुलचा डॉन आहे, माझ्या नादी कुणी लागू नका खल्लास करून टाकीन’ अशी धमकी देत वाहनांची तोडफोड करत होता.

 

फिर्यादी यांनी आरोपीला असे का करतोस असा जाब विचारला असता राग आलेल्या आरोपीने हातातील कोयता फिर्यादी यांच्या मानेवर मारायचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी तो चुकवला. आरोपीने हातातील कोयत्याने सहा दुचाकी, 3 तीन चाकी, 4 चारचाकी अशा एकूण 13 वाहनांची तोडफोड केली. यात वाहनांचे एकूण 44 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले. दाखल फिर्यादीवरुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.