Moshi Crime News : जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न 

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने शरीर व चेह-यावर वार करत एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. मोशी परिसरात सोमवारी (दि.31) रात्री साडे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हर्षल बोराटे (रा. भारतमाता चौक, मोशी) व सूरज महाजन (रा. बनकर वस्ती, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी सौरभ ज्ञानेश्वर गायकवाड (वय 21 रा. भारतमाता चौक, मोशी) यांनी मंगळवारी (दि.1) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादी यांच्या शरीर व चेह-यावर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केला आहे. तसेच, शिवीगाळ करत ‘तुला खल्लास करुन टाकतो’ अशी धमकी दिली व गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.