Bhosari MIDC : तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – भोसरी मधील लांडेवाडी येथे एका तरुणावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. मात्र तरुणाने प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला. त्यानंतर आरोपीने तरुणाच्या दुचाकीसह अन्य नऊ वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री घडली.

 गणेश नामदेव कांबळे (वय 21, रा आंबेडकर नगर, लांडेवाडी, भोसरी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कपिल नंदू (वय 19, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी), याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी कांबळे त्यांच्या दुचाकी जवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी कोयता घेऊन आला. त्याने फिर्यादी यांची कॉलर धरून शिवीगाळ करत ‘तुला मारून टाकतो’ अशी धमकी देऊन कोयता जोरात फिरवला. दरम्यान फिर्यादी यांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या दुचाकीवर कोयत्याने जोरात मारून दुचाकीचे मोठे नुकसान केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या वस्तीतील अन्य नऊ दुचाकी वाहनांवर देखील कोयत्याने मारुन नुकसान केले. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करून वस्तीत दहशत निर्माण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.