Hinjawadi News : बियरची बाटली पोटात खुपसून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये गोंधळ सुरू असताना तिथे काय झाले आहे, हे पाहण्यासाठी आलेल्या तरुणाच्या पोटात बियरची बाटली खुपसून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 18) पहाटे तीन वाजताच्या सुमारास म्हाळुंगे येथे घडली.

विनोद शंकरराव सूर्यवंशी (वय 28, रा. सारथी सोव्हिलीयन अपार्टमेंट, म्हाळुंगे, ता. मुळशी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजित गोकुळ पाखे (रा. देहूद्रा, ता. चाकोर, जि. लातूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित आणि त्याचे मित्र फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास गोंधळ घालत होते. त्यामुळे फिर्यादी बाहेर काय झाले आहे, हे पाहण्यासाठी आले. त्यावेळी काहीही कारण नसताना आरोपी अभिजित याने अर्धवट तुटलेली बियरची बाटली फिर्यादी यांच्या पोटात खुपसून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.