Bhosari Crime News : जुन्या भांडणाच्या रागातून खुनाचा प्रयत्न ; तीन जण अटकेत 

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून कोयते, चॉपर व पिस्टल सारख्या हात्याराने वार करत चार जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हि घटना नेहरूनगर हॉकी स्टेडियम जवळ कचरा डेपोच्या समोर गुरुवारी (दि. 4) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

किरण जैसवाल, सुरज जैसवाल, रोहित भालेराव, रॉबिन सिंग, रोहित कसबे (सर्व रा. नेहरू नगर, पिंपरी), अरविंद शेलार, अदनान, डायमंड (रा. ओटास्किम, निगडी) या आठ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सुरज जैसवाल, रोहित भालेराव, रॉबिन सिंग हे आरोपी अटकेत आहेत.

याप्रकरणी अक्षय आण्णा रणदिवे (वय 26, रा. खंडे वस्ती, एमआयडीसी भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 5) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज जैसवाल याने आपले पूर्वीचे भांडण मिटवण्यासाठी अक्षय खरात याला बोलवले होते. अक्षय खरात सोबत फिर्यादी अक्षय रणदिवे तसेच, सागर प्रधान, घनश्याम यादव व सुशांत जाधव गेले होते. यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून अक्षय खरात याला कोयते, चॉपर व पिस्टल सारख्या हात्याराने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, फिर्यादी यांच्या सह इतर मित्रांवर देखील वार करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी पिस्टल सारख्या हात्याराने आवाज करत, हवेत हात्यारे फिरवून दहशत माजण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.