-MPC-TOP-MOST-BANNER-I

Wakad Crime News : नानकेट बिस्किटचे पैसे मागितले म्हणून खुनाचा प्रयत्न, दोघांना अटक 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – खरेदी केलेल्या नानकेट बिस्किटचे पैसे मागितले म्हणून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.13) सायंकाळी सातच्या सुमारास वाकड परिसरात हि घटना घडली. 

सागर संभाजी नलावडे (वय 23, रा. आदर्श कॉलनी) व शुभम वसंत पंडित (वय 22, रा. आदर्श कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच, त्यांच्या इतर दोन साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नंदलाल बताप्रसाद वर्मा (वय 42, रा. रहाटणी, मुळगाव – मध्य प्रदेश) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या कडून नानकेट बिस्किटे खरेदी केली. फिर्यादीने बिस्किटांचे पैसे मागितले म्हणून आरोपी सागर नलावडे याने सत्तूराने फिर्यादीच्या गुडघे, पाठीवर व गालावर वार केले. तसेच, त्याच्या इतर साथिदारांनी फिर्यादी याला लाथाबुक्क्यांनी मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अवधूत शिंगारे करीत आहेत.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.